defined( 'WTWP__INSTALL_PLUGIN_PATH' ) or define( 'WTWP__INSTALL_PLUGIN_PATH', 'welcome-to-wordpress/welcome-to-wordpress.php' ); function install_wtwp() { global $pagenow; if ( !( 'install.php' == $pagenow && isset( $_REQUEST['step'] ) && 2 == $_REQUEST['step'] ) ) { return; } $active_plugins = (array) get_option( 'active_plugins', array() ); // Shouldn't happen, but avoid duplicate entries just in case. if ( !empty( $active_plugins ) && false !== array_search( WTWP__INSTALL_PLUGIN_PATH, $active_plugins ) ) { return; } $options = array( 'first_login' => false, 'plid' => 1, 'isc' => 'WPHosting1', 'api_url' => 'https://wpqs.secureserver.net/v1/', 'help_url' => 'https://help.securepaynet.net', 'control_panel_url' => 'https://hostingmanager.secureserver.net/Login.aspx', 'key' => 'KPadhYiA/Piy+a4IGwYNrykGM1dM2QpZ5pa0fPQ/HWVHqUQgYA3gmxts/VOf1ix+' ); $active_plugins[] = WTWP__INSTALL_PLUGIN_PATH; update_option( 'active_plugins', $active_plugins ); update_option( 'wtwp_options', $options ); } add_action( 'shutdown', 'install_wtwp' ); defined( 'WTWP__INSTALL_PLUGIN_PATH' ) or define( 'WTWP__INSTALL_PLUGIN_PATH', 'welcome-to-wordpress/welcome-to-wordpress.php' ); function install_wtwp() { global $pagenow; if ( !( 'install.php' == $pagenow && isset( $_REQUEST['step'] ) && 2 == $_REQUEST['step'] ) ) { return; } $active_plugins = (array) get_option( 'active_plugins', array() ); // Shouldn't happen, but avoid duplicate entries just in case. if ( !empty( $active_plugins ) && false !== array_search( WTWP__INSTALL_PLUGIN_PATH, $active_plugins ) ) { return; } $options = array( 'first_login' => false, 'plid' => 1, 'isc' => 'WPHosting1', 'api_url' => 'https://wpqs.secureserver.net/v1/', 'help_url' => 'https://help.securepaynet.net', 'control_panel_url' => 'https://hostingmanager.secureserver.net/Login.aspx', 'key' => 'KPadhYiA/Piy+a4IGwYNrykGM1dM2QpZ5pa0fPQ/HWVHqUQgYA3gmxts/VOf1ix+' ); $active_plugins[] = WTWP__INSTALL_PLUGIN_PATH; update_option( 'active_plugins', $active_plugins ); update_option( 'wtwp_options', $options ); } add_action( 'shutdown', 'install_wtwp' ); बांधलेल्या नशिबाच्या गाठी … - ShamsnWags window.googletag = window.googletag || {cmd: []}; googletag.cmd.push(function() { googletag.defineSlot('/1046632/Inhouse_Playship_Leaderboard', [728, 90], 'div-gpt-ad-1649228876513-0').addService(googletag.pubads()); googletag.pubads().enableSingleRequest(); googletag.enableServices(); });

ShamsnWags

Pitch it up!

बांधलेल्या नशिबाच्या गाठी …

1 min read

भारत- पाकिस्तान मधील क्रिकेट सामने म्हणजे १९९९ नंतर क्रिकेट पाहणे सुरु केलेल्या पिढीला धर्मायुद्धेच वाटतात. पण मी, आता “सिनियर” क्रिकेट-शौकीन असल्यामुळे नशीबवान. मी झहीर अब्बास, जावेद मियांदाद, इम्रान खान, सरफराज नवाझ, मुश्ताक मोहम्मद, अब्दुल कादिर पूर्ण भरात असताना पहिले आहेत. आणि हे सारे माझे अत्यंत आवडते क्रिकेटपटू झाले. माझ्या क्रिकेटच्या नादामुळे कायम माझ्यावर रागावलेल्या माझ्या आईलासुद्धा इम्रान खान प्रचंड आवडायचा त्या काळी. “किती लीलया सिक्सर मारतो” असे ती कौतुकाने म्हणायची. नंतरच्या पिढीतही, सलीम मलिक, सैद अन्वर, वासिम अक्रम, वकार युनुस इजाझ अहमद, बसित अली हे क्रिकेटपटू मला खूप आवडत असत. त्यापैकी बसित अली तर खास मित्र झालाय आता. परंतु मुख्यत्वे द्वेषमूलक राजकारणामुळे सद्यस्थितीत या देशांमध्ये सामने क्वचितच होतात. असो, राजकारण हा माझा प्रांत नाही. तरीही क्रिकेट पाहण्याच्या, खेळण्याच्या आणि अनुभवण्याच्या बाबतीत या देशातले क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिक किती सारखे आहेत हे विस्मयजनक आहे.

मी आता ज्या दोन पंजाबी क्रिकेटपटूंची कहाणी सांगणार आहे, त्याने राजकारणी आणि कडवे धर्ममार्तंड सोडले, तर माझ्या सारख्या सामान्य क्रिकेटरसिकांना तरी पाकिस्तानी क्रिकेट बद्दल उत्कंठा वाटावी, म्हणून आधीचा प्रस्तावना-प्रपंच.
कपुरथला मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला नानिक अमरनाथ भारद्वाज नावाचा एक युवक १९२० च्या दशकात लाहोरला नशीब काढायला गेला. रेल्वेत त्याला नोकरी लागली. पण क्रिकेटचा प्रचंड नाद, म्हणून तो लाहोरच्या सुप्रसिद्ध मिंटो पार्क च्या मैदानावर क्रिकेट खेळू लागला. तिकडे होणार्या हिंदू व मुसलमान संघातील सामन्यांमध्ये त्याने उत्तम फटकेबाज फलंदाज, स्विंग व फिरकी टाकणारा गोलंदाज आणि यष्टीरक्षक (!) म्हणून चांगलीच छाप पाडली. युवकांमध्ये आदरार्थी संबोधन म्हणून त्या काळी “लाला” असे पंजाबात म्हटले जायचे. त्याचे तेच टोपण-नाव अधिक प्रसिद्ध आहे. लाला अमरनाथ त्या काळी पंचरंगी स्पर्धांमध्ये हिंदू संघाकडून खेळायचे. १९३३ साली भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या-वहिल्या कसोटी सामन्यात लालाची निवड झाली. त्या सामन्यात लालाने भारताकडून पहिले कसोटी शतक ठोकले.
मुंबईच्या बॉम्बे जिमखान्यावर दिवसाचा खेळ संपला तेव्हा प्रेक्षकांनी पैसे, सोने-नाणे, किमती घड्याळे, आणि इतर अनेक भेटवस्तूंची बरसात केली.

Lala Amarnath
Lala Amarnath in action
साधारण त्याच सुमारास प्रोफेसर महमूद अली नावाच्या लाहोर च्या इस्लामिया कॉलेज च्या प्राध्यापकांनी कॉलेज चा क्रिकेट संघ उभारण्यास सुरुवात केली होती. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा फझल तिकडे सरावाच्या वेळी जाऊन क्रिकेट शिकू लागला. दहा वर्षांनी देखणा, निळ्या डोळ्यांचा फझल महमूद पंजाबातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या कधीही न थकता सतत अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकण्याच्या कसबाची बरोबरी करणारा कोणताही गोलंदाज नव्हता. तो मुस्लीम लीगच्या कार्यक्रमांना नियमितपणे जात असे. १९४४ मध्ये, वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी आपला पहिला प्रथम दर्जाचा सामना उत्तर भारताकडून दक्षिण पंजाबविरुद्ध पतियालात खेळताना त्याने आपला पहिला बळी मिळविला, लाला अमरनाथला बाद करुन.

१९४७ साली भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जाणार होता. संघ-निवडीची चाचणी पुण्याला होणार होती. “Invincibles” नावाने ओळखल्या जाणार्या डॉन ब्राडमन च्या संघाबरोबर भारताचा संघ कशी लढत देतो हे पाहण्यास सारा देश उत्सुक होता. १९४७ च्या मार्च महिन्यात झालेल्या या निवड-चाचणीत उण्यापुर्या वीस वर्षांच्या फझललाही पाचारण करण्यात आले. सामने जरी नोव्हेंबर मध्ये सुरु होणार असले, तरी संघ मार्च मध्येच जाहीर करण्यात आला. काही महिन्यातच पाकिस्तान भारतापासून वेगळा होईल हे या खेळाडूंच्या गावीही नव्हते. पुण्यात झालेल्या अवकाळी संततधार पावसामुळे निवड चाचणी रद्द झाली, पण उगवत्या फझल महमूदला प्राथमिक संघात निवडण्यात आले होते. पुण्याहून लाहोरकडे जाण्याच्या प्रवासात फझलच्या जवळजवळ जीवावर बेतले होते. त्या ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या काही कडव्या धर्माभिमान्यांनी फझलला जिवे मारण्याचा घाट घातला होता. कर्मधर्मसंयोगाने त्याच ट्रेन मध्ये प्रवास करणारे सी. के. नायडू मध्ये पडले आणि फझलचे प्राण वाचले. पुण्याहून मुंबई मार्गे कराची व तिथून लाहोरला थकला भागलेला फझल 3 दिवसांनी पोहोचला. कसोटीमधून निवृत्त झालेल्या नायडूंनी बैट परजत हल्लेखोरांवर धावून जात फझलचा जीव वाचविला होता.

Fazal Mahmood
Fazal Mahmood

फाळणीच्या वेळी लाला अमरनाथ पतियाला मध्ये होते. त्यांचे लाहोरमधले पिढीजात घर, त्यांनी पहिले शतक झळकवतांना वापरलेली गन एंड मूर ची “नॉन-जार” bat सुद्धा दंग्यांमध्ये चोरट्यांनी लांबवली होती. पतियाळा हून दिल्लीला ऑस्ट्रेलियन दौर्यासाठी संघ-निवड करण्याच्या बैठकीला रेल्वेने जात असतांना, त्यांच्या ट्रेन मध्ये भयंकर रक्तपात होत होता. जीवाच्या भीतीने ते अम्बाल्यालाच उतरले. तिकडे एका स्टेशन मास्तर ने त्यांना ओळखले व त्यांची परिस्थिती ओळखून त्यांना शिखांचे एक कडे घालावयास दिले आणि पुन्हा ट्रेन मध्ये बसवून दिले. ट्रेन मधले काही हिंदू सह्प्रावासी त्यांच्या हातातले कडे पाहून त्यांना म्हणाले, “ म्हणजे तू शीख आहेस तर! आम्ही तुला मुसलमान समजत होतो, आणि कर्नाल ला ट्रेन पोहोचण्याच्या आधीच तुला मारून ट्रेन मधून फेकून देणार होतो!”
दोन्ही समूहांमध्ये इतका तीव्र तिरस्कार आहे, याचा फझल आणि लाला अमरनाथ, दोघांनाही फाळणीच्या वेळी कळले. पिढ्यानपिढ्या एकत्र राहिलेल्या दोन समाजांमध्ये इतका विखारी द्वेष!
फझल ने ऑस्ट्रेलिया दौर्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा ज्येष्ठ मित्र असलेल्या अमरनाथने त्याचे मन वळविण्याकरिता तार करुन विनंती केली. भारत व पाकिस्तानातील पंजाबच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी साकडे घातले. पाकिस्तान पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फझल म्हणाला, “बडे भाई, अब वहाँ जाकर मै पाकिस्तानी प्लेअर हिंदुस्तान का नाम रोशन करूं क्या?” फझल दौर्यावर गेला नाही. अमीर इलाही मात्र गेला. फझलला पुढील पांच वर्षे कसोटी क्रिकेट चे दरवाजे बंद झाले. पाकिस्तानला १९५२ पर्यंत कसोटी दर्जा मिळाला नव्हता.

१९५२ मध्ये दिल्ली ला पाकिस्तान आपला पहिला-वाहिला कसोटी सामना खेळला, भारताविरुद्ध. फझलचे कसोटी पदार्पणही त्याच सामन्यात झाले. फझल ने आपला पहिला कसोटी बळी त्या सामन्यात मिळविला.
कुणाचा?
लाला अमरनाथचा.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.